शब्दफुले वेचतांना....

Monday, 2 December 2013

मातीमोल

हिवाळ्यातला पाऊस
ढगांची दाटी
पळतोय चंद्र

कुंद हवा
सुटले आभाळ
पावसाची चुकार सर

झुलणारी फांदी
त्यावर एकच थेंबुटला
ओघळतांना वाचला

स्वतःचेच प्रतिबिंब
निरखतेय त्यात
खोलखोल आरपार

तुझ्या माझ्या आयुष्यात
अधांतरी लटकणं
एवढच नशिबात?

कुणी झेललं
ओंजळीत तर ठीक
...नाहीतर मातीमोलच!!

No comments:

Post a Comment